डॉक्टर म्हणजे देवदूतच - उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथे १ जुलै रोजी डॉक्टर दिवसचे औचित्य साधुन पत्रकार इरफान बागवान यांच्यावतीने बाल रोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे व सौ.माधुरी काळे यांचा सत्कार सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल ,डॉ. मोरे ,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी ,उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, शिवसेना शहर प्रमुख बालाजी दहे ,पत्रकार भैय्यासाहेब गायकवाड ,हाफिज बागवान ,अलिम खान पटेल, शेख मुस्ताक ,आसिर खान ,शगीर खान ,रफिक बागवान यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की
आजही गावखेड्यांत डॉक्टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस "डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो.सध्या भारतातील सर्वच डॉक्टर "कोविड-१९' अर्थात "कोरोना'विरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत असे ते म्हणाले त्यानंतर मानवत येथील डॉ. निनांद दगडू ,डॉ.जुबेर खान ,डॉ.सय्यद अलीम,डॉ. भारत कदम,डॉ. मनीषा गुजराथी तसेच ग्रामीण रुग्णालय येथील प्रशांत खिल्लारे व डॉक्टरांचा ही सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment