मानवत येथे ईधन दरवाढ विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन
मानवत / मुस्तखीम बेलदार
महागाईचा दाह सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता इंधन दरवाढीचेही चटके बसू लागले आहेत.
देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून,
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांच्या खिशालाही झळ बसू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी केव्हाच शंभरी ओलांडली असून, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे याच्या निषेधार्थ मानवत तालुका काँग्रेस कमिटिचे वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात केन्द्र सरकारचा निषेध करत महाराणा प्रताप चौक येथुन पेट्रोल पंप पर्यत सायकल रँली काढुन आंदोलन करण्यात आले.
या वेळी बाळासाहेब फुलारी, जिल्हा परीषद सदस्य बाबूराव नागेश्वर, तालुकाध्यक्ष सिध्देश्वर लाड़ाने,मानोली सरपंच ज्ञानेश्वर शिंदे,शाम चव्हाण, बाबाजी अवचार, नगरसेवक आंनद भदर्गे , परभणी जिल्हा युवक कॉंग्रेसचे सचिव वसीम कुरेशी, आसाराम काळे, खय्युम बागवान आदी कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment