गुन्हेगारांचे कर्दनकाळ मानवत पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची बदली
मानवत / मुस्तखीम बेलदार
गुन्हेगाराचा कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधिकारी ज्याच्या नावाने दोन नंबर धंदेवाल्यांचे धाबे दणाणत जात असे ख्याती प्राप्त मानवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची परभणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अधीक्षक कार्यालय परभणी येथे बदली झाली आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे हे मानवत पोलीस स्टेशन ला हजर झाल्यापासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर ,अवैध प्रवासी वाहतूक ,अवैध धंदे ,अवैध दारु विक्रेतावर ,राशन चा काळाबाजार करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली यामुळे मानवत तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले होते . पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी मानवत तालुक्यातील इटाली येथील पाण्याच्या कॅनल मध्ये कुजलेली अज्ञात मयती ची ओळख पटवून गुन्ह्यांचा छडा लावुन आरोपींना अटक केली होती त्याच प्रमाणे मागील दोन वर्षापासून कोरोणा महामारी च्या काळात मानवत शहर व तालुक्यात चागले कार्य केले होते शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशिल राहत होते नागनाथ तुकडे हे एक शिस्तप्रिय प्रमाणिक मनमिळावू पोलीस अधिकारी म्हणून मानवत तालुक्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी आपुलकिचे स्थान निर्माण केले होते.
No comments:
Post a Comment