चोरी करण्यापुर्वीच पाच चोरांना मानवत पोलीसांनी केली अटक
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांची पाच जणांची एक टोळी दि.११ आँगस्ट च्या राञी जेरबंद केली रात्री गस्त घालीत असताना पाच जण वाहनाद्वारे जात असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यामध्ये त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडण्यात आले
अनिल पवार परबीन सिंग कृष्णागिरी अर्जुन पवार रमेश दाभाडे अशी या आरोपींची नावे आहे
पाळोदी रोड टी पॉईंट मध्ये रात्री दीड वाजताच्या सुमारास एका मोटरसायकलवर पाच दरोडेखोर जात असताना सपोनि भरत जाधव पो ना वड राख क्षीरसागर शेख वसीम वायाळ चव्हाण घुगे यांनी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दरोडेखोर हत्यारानिशी पकडले आहे सदर आरोपींनी यापूर्वीसुद्धा मानवत पाथरी शहरात चोरी केली होती रेकार्डवर ते सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती मिळत आहे.
No comments:
Post a Comment