मानवत राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी पंकज आंबेगावकर यांची निवड
[] जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान []
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी दि.२४ सप्टेंबर रोजी पाथरी येथे आयोजित मेळाव्यात त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले .
आ . बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.१०० शिलाई मशिन व ५० पिठाच्या गिरणी वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . यावेळी पंकज आंबेगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री राजेश टोपे,
आ. बाबाजानी दुर्राणी ,
मा .खा . जयसिंगराव गायकवाड , मा जि.प .अध्यक्ष राजेश विटेकर,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के , नगराध्यक्षा मिना नितिन भोरे,
मा .जि.प .सदस्य दादासाहेब टेंगसे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मुंजाजी भालेपाटील , मुजाहिद खान, अनिलराव नखाते , तबरेज दुर्राणी , मानवतचे तालुकाध्यक्ष संतोष लाडाने यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी पंकज आंबेगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वच स्तरारुन शुभेच्छा मिळत असुन पुढिल नगरपरिषदच्या निवडणुकित याचा फायदा पक्षाला होणार आहे.