मानवत नगर परिषद येथे सी सी टिव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा संपन्न
मानवत / मुस्तखीम बेलदार
मागील काही दिवसांपासून मानवत शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते यापार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदेने याची गंभीर दखल घेत शहरातील प्रमुख ठिकाणांवर एकूण ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा शब्द दिला होता अवघ्या काही दिवसातच दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करीत आज मान्यवरांच्या उपस्थितीत या सी सी टिव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा नगरपरीषद येथे दि.१ सप्टेंबर रोजी पार पडला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड साहेब म्हणाले की, शहरातील महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आल्याने मानवत मध्ये यापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निगराणी राहणार असुन शहराची एकता व सुरक्षा कायम राखण्यासाठी नगर परिषदेचे हे कार्य चांगले असल्याचे सांगत कौतुक केले. सदरील कॅमेऱ्याचे कन्ट्रोल ही आज मानवत पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आला.
नागरिकांची सुरक्षितता जोपासतानाच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यासाठीच नगर परिषदेने हा उपक्रम राबवला. यापुढे सुद्धा गरज पडेल तेंव्हा अशा विविध कार्यासाठी नगर परिषद कार्यरत राहील व नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा प्रयत्न करेल असे युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रा. एस. एन पाटील सर, तहसीलदार श्री. फुफाटे साहेब, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड साहेब, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, युवानेते डॉ.अंकुश लाड,वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र वर्मा,नगरसेवक गिरीश जी कत्रुवार, बाबुराव हालनोर, गणेशशेठ कुमावत, मोहनराव लाड, दत्ता चौधरी, नगरसेवक विनोद रहाटे, श्रीकांत देशमुख, किरण बारहाते, समाजसेवक अफसर भाई,नगरसेवक जमिल भाई,नगरसेवक रहीम भाई, कार्यकारी अभियंता सय्यद अन्वर, अमोल तांदळे, असिस्टंट टाऊन प्लॅनर सचिन पवार, पत्रकार महासंघाचे अध्यक्ष किसनराव बारहाते, अंकुशराव फड, सुरेशराव कच्छवे, वाजेद भाई, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी , अधिकारी व शहरातील इतर व्यापारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment