मोहम्मद ईस्माईल सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
मानवत / मुस्तखीम बेलदार
जिल्हा परिषद प्रशाला पाथरी येथील शिक्षक मोहम्मद ईस्माईल याना यंदाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या निवडी बद्दल च्या प्रस्तावास मान्यता दिल्या बाबत चे विभागीय आयुक्त कार्यलयाचे पत्र नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून त्या पत्रान्वये ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण कोरोना आजाराच्या मार्गदर्शक तत्व नुसार करण्यात येणार आहे .
राज बेलदार समाजातील भटक्या जमातीतुन येणारे पाथरी येथील भुमीपुञ मोहम्मद ईस्माईल सर यांनी जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेत काम करीत असताना शाळेतील होतकरू मेहनती विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे तसेच कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांचा संपर्क साधून शिक्षण चालू ठेवून शांत स्वभाव सर्वाना मन मिळावू असे काम त्यांनी आपल्या कर्त्यव्य पार पडताना केले म्हणूनच त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या असला चे बोलले जात आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल राज बेलदार संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा.नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर,सय्यद विखार ईलाहि ,मुस्तखीम बेलदार , त्यांचे शाळेतील शिक्षक आदी नातेवाईकांनी अभिनंदन करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
No comments:
Post a Comment