Friday, September 3, 2021

औरंगाबाद येथे शिक्षक दिनानिमित्त आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.

शिक्षक दिनानिमित्त आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन.
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 
औरंगाबाद महानगरपालिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा व केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा  औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात समाज व विद्यार्थी हिताचे विविध ऊपक्रम राबवुन शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्यां आदर्श व गुणवंत शिक्षकाचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी तीन वाजता मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केन्द्र सभागृह मजनु हिल गार्डन समोर औरंगाबाद येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.डॉ.संतोष टेगले उपायुक्त  शिक्षण विभाग प्रमुख मनपा औरंगाबाद तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री. आ. अतुल सावे आमदार पूर्व औरंगाबाद तथा माजी उद्योग मंत्री यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
तर प्रमुख उपस्थीती म्हणुन माननीय राखीताई प्रशांत देसरडा मा. नगरसेवक तथा मानंद अध्यक्षा  शालेय व्यवस्थापन समिती , मा. डॉ. संजीवनी मुळे प्राचार्य शासकीय बीएड महाविद्यालय औरंगाबाद, मा. श्री संजीव सोनार सांस्कृतिक अधिकारी मनपा औरंगाबाद, मा.श्रीमती छायाबाई चव्हाण अध्यक्षा  शालेय व्यवस्थापन समिती इंदिरानगर बायजीपुरा , मा. डॉ. जी एम गायकवाड ज्येष्ठ अधिव्याख्याता शासकीय बीएड कॉलेज औरंगाबाद, मा. श्री कैलास भाऊ गायकवाड ज्येष्ठ मा. नगरसेवक, मा. श्री रामनाथ थोरे सर  शिक्षणाधिकारी मनपा औरंगाबाद, मा.श्री रमेश जायभाये मा. नगरसेवक इंदिरानगर बायजीपुरा , मा.श्री संजय जाईबहार कार्याध्यक्ष शालेय  व्यवस्थापन समिती, मा. श्री ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा मनपा औरंगाबाद व सर्व पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समिती इंदिरानगर बायजीपुरा  यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी  उपस्थीत राहण्याचे आवाहान मुख्यध्यापक  श्री देवेंद्र रूपरावजी सोळंके , शिक्षक वृंद व कर्मचारी इंदिरानगर बायजीपुरा  व चिकलठाणा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment