Thursday, August 31, 2023

किर्ती सुरेंद्र करपे यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर .

किर्ती सुरेंद्र करपे यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर .
मानवत / मुस्तखीम बेलदार 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दर्पण कार बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार जि.प प्रा .शा खरबा येथील शिक्षिका श्रीमती कीर्ती सुरेंद्र करपे यांना जाहीर झाला आहे.
श्रीमती करपे मॅडम यांचे सामाजिक संस्कृती धार्मिक व राष्ट्रीय कार्य उल्लेखनीय  आहे शिक्षण क्षेत्रा बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बाल संस्कार शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन वृक्ष लागवड व राष्ट्रीय एकात्मता यांचे विषय कार्य केले आहे हा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कालिदास कला मंदिर नाशिक येथे सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले आहे या पुरस्कारासाठी श्रीमती कीर्ती करपे यांचे परिवार नातेवाईक व सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत असुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे.

No comments:

Post a Comment