मानवत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था
मानवत / मुस्तखीम बेलदार
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मानवत शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रभागात मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून मतदानाची टक्केवारी वाढावी व समाजातील सर्व स्तरांमधील मतदारांना मतदान करता यावे याकरिता मानवत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांना प्रशासनाच्या वतीने व्हील चेअर व रॅम्प ची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहू नये हा यामागचा उद्देश आहे. ही व्यवस्था शहरातील सर्व मतदान केंद्रावरती करण्यात आलेली आहे जेणेकरून मतदान करणे सोयीचे व सुखकर होईल. दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी या सोयीचा लाभ घ्यावा व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान रुपी आपले योगदान द्यावे असे आवाहन श्रीमती. कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत नगर परिषदेचे श्री. सय्यद अन्वर शहर अभियंता, श्री भगवानराव शिंदे, कार्यालयीन अधिक्षक, श्री.संतोष उन्हाळे, कर निरीक्षक, श्री. मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री. महेश कदम, अंतर्गत लेखापरीक्षक, श्री शतानिक जोशी, विद्युत अभियंता,श्री संतोष खरात, संगणक अभियंता,श्री. मुंजाभाऊ गवारे, स्वच्छता निरीक्षक,श्री.भारत पवार, श्री.राजेश शर्मा,श्री. संजय रुद्रवार,श्री. सुनील कीर्तने, मुक्कादाम, श्री दीपक भदर्गे, श्री. जावेद मीर व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी काटेकोरपणे निवडणुकांचे कामकाज पाहत आहेत.
No comments:
Post a Comment