मानवत येथे रमजान ईद ऊत्साहात साजरी
मानवत / मुस्तखीम बेलदार
बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर दि. ११ एप्रिल रोजी शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह येथे सार्वजनिक ईद ची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा करुन ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद मोठ्या ऊत्साहात मुस्लीम बांधवांनी साजरी केली.
या वेळी खुदबा हाफेज अय्याज यांनी दिला
हाफेज हाजी मोहम्मद लतिफ यांनी सार्वजनिक नमाज पठण केली. सर्व मुस्लिम बांधवांनी एक मेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा, सोशल मीडियाचा वापर योग्य करावा कोणाच्याही भावना दुखवणारी पोस्ट टाकू नये, त्याचबरोबर आपण एक दुसऱ्या चा धर्माचा आदर करावा असा संदेश धर्मगुरूंनी मौलाना असलम खान इशाती यांनी दिला .
मौलाना मुजाहिद यांनी मानवत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी आझाद पाणी सप्लायर यांच्यावतीने मोफत जारचे पाणी उपलब्ध केले होते. नमाज नंतर सामूहिक प्रार्थना दुवा करण्यात आली.
पोलीस प्रशासन व राजकीय पुढारीना जमाते इस्लामी हिंद च्या वतीने दिव्य कुराण मराठी अनुवाद भेट म्हणुन देऊन शुभेच्छा देण्यात आले
यावेळी पो.नि.दिपक दंतुलवार ,आनंद मामा भदर्गे ,दिपक बारहाते,रुषीकेष बारहाते, पवन बारहाते,फकिरा सोनवने, श्रीकांत देशमुख ,विक्रम दहे ,भारत पवार आदीनी ईदगाह मैदानात उपस्थीत राहुन मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment