मानवत शहरांमध्ये २६ बुथवर ५७% मतदान
[]नव मतदारांसह महिला व जेष्ठा मध्ये दिसून आला मतदानाचा उत्साह []
मानवत / मुस्तखीम बेलदार
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक २६ मार्च शुक्रवारी रोजी मानवत शहरांमध्ये एकूण २६ बुथवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती नव मतदारांसह महिला व जेष्ठामध्ये मतदानाचा ऊत्साह दिसून आला
मानवत शहरात ३०४६८ मतदार असुन
पुरुष १५३६३ तर महिला मतदार १५१०५
आहे शहरातील २६ बुथवर १७४३६ मतदान झाले यात पुरुष ९३३६ व ८१०० महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला
मानवत शहरांमध्ये २६ बुथवर एकुण ५७% मतदान झाले आहे .
मानवत नगर परिषद च्या वतीने दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या.
मतदान केंद्रावर मतदाराच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या मतदान शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मानवत पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मानवत शहरासह तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.महाविकास आघाडिचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर याच्यांत मुख्य लढत झाल्याचे निवडणुकित दिसुन आले भावी खासदाराचे भवितव्य मतपेटित बंद झाले असुन निकाल ४ जुन रोजी जाहिर होणार आहे याकडे आता पुर्ण परभणी जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment