उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानवत दौरा
[] शिवसेना नेते बालाजी कुऱ्हाडे यांच्या निवासस्थानी देणार भेट []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
शिवसेनेचे नेते तथा माजी नगरसेवक बालाजी कुऱ्हाडे यांच्या मानवत येथील निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ११ मे रोजी भेट देणार असल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली ११ मे रोजी पाथरी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे आधी मानवतला येणार असून, ते थेट रचना कोलोनी येथील माजी नगरसेवक शिवसेनेचे नेते बालाजी कुऱ्हाडे यांच्या घरी भेट देतील. तसेच आरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे या भेटीला अनन्यसाधारण राजकीय महत्त्व असून, नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
स्थानिक पातळीवर बालाजी कुऱ्हाडे यांचा प्रभाव लक्षात घेता ही भेट राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारी ठरू शकते, असा तर्क लावला जात आहे. शहरात शिंदे गटाच्या हालचालींना वेग आला असून, पक्ष बळकट करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण रणनीती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
यावेळी शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सुरक्षा यंत्रणांनीही आवश्यक तयारी केली आहे.
मानवत शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नागरिक, कार्यकर्ते आणि विरोधकही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.
No comments:
Post a Comment