Saturday, May 10, 2025

मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मानवत येथील शिवसेना नेते बालाजी कुराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
[] वाढदिवसानिमित वृद्धाश्रमात वृद्धांना केले फळवाटप  []
मानवत/ मुस्तखीम बेलदार
मानवत येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा समाजसेवक , शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे समर्थक बालाजी कुराडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमासह मोठ्या उत्साहात दि.९  मे रोजी साजरा करण्यात आला.
युवा नेते बालाजी कुराडे यांनी वृद्धाश्रमात आपल्या वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन प्रेमळ भेट देत वृद्धांना फळवाटप केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला
आश्रमातील प्रत्येक चेहऱ्यावर यावेळी हास्य उमटले होते.
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बालाजी कुराडे यांना वाढदिवसा निमित्त शाल व हार घालून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात ढोल ताशे च्या गजरात नागरीकांनी बालाजी कुराडे यांचे जंगी स्वागत करत वाढदिवस साजरा केला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील स्थानिक नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था नी  बालाजी कुराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहे.






No comments:

Post a Comment