Monday, January 19, 2026

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
[] युवा पँथर्सचे मानवत पोलिस ठाण्यात निवेदन []
मानवत / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील मौजे हमदापूर, ता. मानवत, जि. परभणी येथे गावातील काही जातिवादी गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर संगनमत करून सामूहिक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा पँथर्स (मानवत, ता. मानवत, जि. परभणी) संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिनांक १९ जानेवारी  रोजी मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर हल्ल्यात ६ ते ८ पुरुष व ४ ते ५ महिलांना गंभीर मारहाण करण्यात आली असून, बालक व बालिकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत अमानवी व समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी आरोपींना जामीन न देता, घटनेचा सखोल व तात्काळ तपास करून भादंवि कलम ३०७ सह अन्य गंभीर कलमे लावावीत, तसेच ज्यांच्यावर ठोस पुरावे आहेत अशा सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात ग्रामीण भागातील बौद्ध समाजावर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा युवा पँथर्स संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर रविभाऊ पंडित ,दीपक ठेंगे ,अमोल मगर ,जनार्दन कीर्तने , गौतम जमदाडे,नागसेन भदर्गे, विजय खरात ,किरण पंडित  आदिच्या स्वाक्षरी आहे.

हमदापूर येथील बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी [] युवा पँथर्सचे मानवत पोलिस ठाण्यात निवेदन [] मानवत / प्रतिनिधी मानवत तालुक्यातील मौजे हमदापूर, ता. मानवत, जि. परभणी येथे गावातील काही जातिवादी गावगुंडांनी बौद्ध समाजाच्या लोकांवर संगनमत करून सामूहिक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा पँथ�

Monday, January 12, 2026

मानवत शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी मोईन अन्सारी यांची नियुक्ती


मानवत शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी मोईन अन्सारी यांची नियुक्ती
मानवत / मुस्तखीम बेलदार 
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी मानवत तालुक्यात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी मा. सईद खान यांनी मानवत येथील मा. म. मोईन म. तकी अन्सारी यांची शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख मानवत या पदावर नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब  पक्षप्रमुख मा. आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेनुसार आणि मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीप्रसंगी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी, अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडून घेण्यासाठी तसेच मानवत तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी मोईन अन्सारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल मानवत तालुक्यातील शिवसैनिक व अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांकडून मोईन अन्सारी यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Saturday, January 10, 2026

विकास पुरुष डॉ. अंकुश भाऊ लाड यांचा सत्कार

विकास पुरुष डॉ. अंकुश भाऊ लाड यांची मानवत नगरपालिका उपनगराध्यक्षपदी 
बिनविरोध  निवड झाल्याबद्दल डॉ. भिमराव प्रतिष्ठान महा-राज्य तर्फे त्यांचा स्वागत करण्यात आले यावेळी 
आशिष घुगे ,मूकतार भैय्या ,शेख वाजेद , सनीकेत  पौळ , आवेज शेख उपस्थित होते.
 

Tuesday, January 6, 2026

परभणी येथील दर्गारोड प्र. क्र. ११ मध्ये बदलाची लाट; काँग्रेस उमेदवारांना वाढता पाठिंबा


परभणी येथील दर्गारोड प्र. क्र. ११ मध्ये बदलाची लाट; काँग्रेस उमेदवारांना वाढता पाठिंबा

परभणी / प्रतिनिधी

दर्गा रोड, परभणी येथील प्रभाग क्रमांक ११ मधील १५ जानेवारी रोजी होणारी  महानगर पालिका निवडणूक आता थेट जनतेच्या हाती गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मागील आठ वर्षांमध्ये अपेक्षित असलेला विकास न झाल्याने प्रभागाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते, नाल्या, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे दर्गा रोड प्रभाग क्रमांक ११ येथील जागृत मतदारांनी निवडणूक आपल्या हातात घेत काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचा प्रचार स्वतः करत असताना दिसत आहे 
या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनता जनार्दन पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकिरा बेगम मोहम्मद नय्युमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद तसेच मुसदिख खान नुरुल्ला खान उर्फ मुश्शु खान यांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
प्रभागातील सुज्ञ व जागरूक मतदारांनी यावेळी निवडणूक आपल्या हाती घेत बदल घडवून आणण्याचा निर्धार केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Friday, January 2, 2026

प्रभाग ११ दर्गा रोड परभणी येथील काँग्रेस उमेदवारांची प्रचारात आघाडी !


प्रभाग ११ दर्गा रोड परभणी येथील काँग्रेस उमेदवारांची प्रचारात आघाडी !

परभणी / प्रतिनिधी 
प्रभाग क्रमांक ११ दर्गा रोड, परभणी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शमशाद बेगम सय्यद इलाही राज, जाकिरा बेगम मोहम्मद नय्युमुद्दीन, रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद तसेच मुसदिख खान नुरुल्ला खान उर्फ मुश्शु खान यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे.
घराघरांत जाऊन, तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेत उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर भर देत विकासाचा अजेंडा मांडण्यात येत आहे . प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला जात आहे.
घरोघरी जाऊन मतदारापर्यंत पोहोचत विकास कार्याच्या आश्वासनावर हे उमेदवार मतदान नागरिकांना मागत आहेत यामुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक अधिक रंगतदार बनली असून काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना   युवकासह सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे.मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता प्रभाग क्रमांक ११ मध्ये काँग्रेस उमेदवारांची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसून येत आहे.