मानवत शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी मोईन अन्सारी यांची नियुक्ती
मानवत / मुस्तखीम बेलदार
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी मानवत तालुक्यात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी मा. सईद खान यांनी मानवत येथील मा. म. मोईन म. तकी अन्सारी यांची शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख मानवत या पदावर नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब पक्षप्रमुख मा. आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेनुसार आणि मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीप्रसंगी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी, अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडून घेण्यासाठी तसेच मानवत तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी मोईन अन्सारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल मानवत तालुक्यातील शिवसैनिक व अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांकडून मोईन अन्सारी यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment