Sunday, September 6, 2020

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड.

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि. ६: भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असणारे तथा जेष्ट समाजसेवक  गुलाब शेख यांची दि. ६ सप्टेंबर रोजी भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तालुका अध्यक्ष विश्वनाथ प्रल्हादराव लाडाने यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र  पाथरी विधानसभा चे माजी आमदार मोहन फड यांच्या हस्ते मानवत येथील गार्डन परिसरात गुलाब शेख यांना देण्यात आले आहे. 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मोईज अन्सारी, ओ बी सी  जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राजू रणदिवे, आसेफ खान, बोचरे पाटील आदी उपस्थित होते. गुलाब शेख  यांच्या  निवडीचे स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा मिळत आहें. 

No comments:

Post a Comment