बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.
विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.२४: राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा परिवाराच्या वतीने बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद सय्यद चॉद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप करण्याचे आयोजन
राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा चे मुख्यसंपादक सय्यद अबरार ईलाहि यांच्या मार्गदर्शनाखाली राज बेलदार समाजातील शिक्षक ,डॉकटर , सामाजिक कार्यकर्ते, पञकार ,शासकिय अधिकारी यांच्यासह ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात आपल्या क्षेत्रात उत्तम कामगीरी करुन कोरोना या महामारीत आपली व आपल्या परीवाराची जिवाची पर्वा ना करता कोरोना या राष्ट्रीय आपदात आपले योगदान दिल्याबद्दल कोरोना योध्दा सन्मानपञ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे यासाठी समाजबांधवानी आपले आधारकार्ड ,एक पासपोर्ट फोटो राज बेलदार समाजसेवा मंडळ मुख्य कार्यालय दर्गारोड परभणी येथील कार्यालयात जमा करावा किंवा मो.9011633704, 9860109007 या क्रंमाकावर संपर्क करण्याचे आवाहान संघटनाचे अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा. नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर , महाराष्ट्र राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment