Sunday, September 20, 2020

संजय नाईक यांनी वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला केली मदत

संजय नाईक यांनी  वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला दिली देणगी.
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२०: मानवत तालुका पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन वृक्षलागवड व संवर्धनासाठी रामपुरी येथील वृक्षवंल्ली फाउंडेशन ला ३५५५   रुपयाची देणगी २० सप्टेंबर रोजी देऊन वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करुन समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाबद्दल संजय नाईक यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत.

No comments:

Post a Comment