मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर संपन्न.
मानवत / प्रतिनिधी
दि.१: टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१ नोव्हेंबर रोजी मानवत येथील वाघेश्वर मंदिर स्वामी दिव्यानंद उद्यान येथे नेत्ररोग तपासणी निदान शिबिराचे आयोजन सुनील भाऊ जाधव व प्रीतम भाऊ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते,
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर असोसिएशनचे मानवत अध्यक्ष डॉ.योगेश तोडकरी, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.मोहन कुमावत, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. खान शकिल अहेमद, युवा नेते यश दादा कत्रुवार, टायगर ग्रुपचे समीर शेख यांच्या हस्ते करुन कार्यक्रम सुरु करण्यात आले .या शिबिरात ४२ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली यात १२ नागरीकांना मोती बिंदू झालेले आढळले यांना यावेळी योग्य मार्गदर्शन करून परभणी येथे शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार मोहनभाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड,सुरेश भुमरे,बाबा हालनोर,दत्तराव चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर शेख, अविनाश दहे,शुभम दहे, अनिल पडूळकर वाजेद भैया शेख, दिपक लाड, अभी सांगुळे , वसीम शेख आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment