Wednesday, November 18, 2020

मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप

दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप 
[] डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम[] 
मानवत/ मुस्तखीम बेलदार 
दि.१८ : स्वर्गीय डॉ. नेत्रदीप दगडू यांच्या जयंती निमित्त शहरातील डॉ. नेत्रदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील गरजु दिव्यांग तरुणांला  मदतीचा हात देत मोफत तीन चाकी सायकलचे वाटप  १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या सायकलच्या साहाय्याने तरुणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत मिळणार आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, अध्यक्ष डॉ एन बी दगडू, डॉ निनाद दगडु, डॉ मनिषा गुजराथी, ॲड गणेश मोरे पाटील,महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन गिराम, श्री वीरकर, डॉ कहेकर, कुलदिप दगडु, आदी उपस्थित होते. शहरातील बांगड प्लॉट भागतातील रहिवाशी शेख लतीफ शेख मोईन या दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकल भेट दिली. यावेळी  झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना साहेब भेंडेकर यांनी सामजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून गरजूना मदत करण्याचे आव्हान केले. दगडु चॅरिटेबल ट्रस्टच्या इतर उपक्रमाची माहिती दिली . डॉ निनाद दगडु यांनी नव्याने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमा विषयी माहिती दिली.  प्रास्तावीक सत्यशील धबडगे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  किशोर तूपसागर यांनी मानले. 


No comments:

Post a Comment