जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ
च्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार मानवत मार्फत निवेदन सादर करुन पिडित चर्मकार समाजातील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून विष पाजुन मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की चर्मकार समाजातील २० वर्षीय युवती मामाच्या गावी टोळी ता. पारोळा जि. जळगाव येथे दिवाळीसाठी आली असता. गावातील चार नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजले व मेली समजून सोडून दिले. या अमानुष घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ जाहीर निषेध करीत आहे व पिडितावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी पिडिताच्या कुटुंबाचे पुनर्वसन शहरात करण्यात यावे व त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,ज्या पोलिसांनी पिडिताचा मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही त्या सर्व पोलीसांना सह आरोपी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,पडळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील चर्मकार समाजाच्या २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यामध्ये जर लवकरात लवकर कारवाही नाही झाली तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरली ठोंबरे,उपअध्यक्ष
ज्ञानेश्वर पानझाडे,सल्लागार विलास पतंगे,शहर प्रमुख हनुमान नांदुरे,कार्याध्यक्ष नितीन हाळणे,
युवा अध्यक्ष परमेश्वर पाटील,केशव पवार
अर्जुन ठोंबरे,गणपत ठोंबरे,राधेश्याम कुरील,रमेश केंदळे,राजेंद्र कांबळे,रामेश्वर आगवणे आदीच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment