तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमदापूर शाळेचे घवघवीत यश
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुक्यातील हमदापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे . याबाबत सविस्तर वृत असे की , मानवत येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी तालुका संशोधन केंद्राचा वतीने केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
यावेळी हमदापूर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील विदयार्थीनी कु . मनस्वी विक्रम शिंदे हिने मानवत तालुक्यातील प्रथम क्रमांक मिळविला
तालुकास्तरीय इंग्रजी शब्दसंग्रह स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिक्षक हमदापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नजात पठाण सर , श्याम सुर्यवंशी सर, हनुमंत नागरगोजे सर , योगेश कांबळे सर, न्याजुद्दीन शेख सर , कल्पेश खैरनार सर या सर्व शिक्षकांचे व यशस्वी विदयार्थ्यांचे व पालक श्री.विक्रम बालासाहेब शिंदे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी डी . आर . रणमाळे साहेब , केंद्रप्रमुख सौ.माया जानराव मॅडम व सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट सर , यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तालुका गट साधन केंद्राच्या टीमचे ही विशेष आभार मानले. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अंजली नामदेव उपाडे व उपाध्यक्ष श्री.भगवान निळे तसेच सर्व सन्माननीय सदस्य यांनी स्पर्धक विद्यार्थ्यानी व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment