मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची बिनविरोध निवड दि.२ जानेवारी रोजी करण्यात आली.
शहरातील कृषी ऊत्पन्न बाजार समिती येथील कार्यालयात या बैठकिचे आयोजन मावळते अध्यक्ष किशन बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या बैठकित सर्वानुमते अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर ,सचिवपदी विलासराव बारहाते,कार्याध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड , डॉ. सचिन चिद्रवार,उपाध्यक्षपदी रमेशराव यादव , प्रमोद तारे ,सहसचिवपदी इरफान बागवान ,अलीम खान पटेल,कोषाध्यक्षपदी प्रा. गोविंद गोलाईत ,
सहकोषाध्यक्षपदी सचिन मगर तर सल्लागारपदी
अश्रोबा केदारे , के. डि. वर्मा ,गोपाळराव लाड यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पञकार संघाचे माजी सचीव पञकार अरुन मानेकर यांचे दुखद निधन झाल्याबद्दल दोन मिनीट मौन ठेवुन त्यांना आंदराजली वाहण्यात आली तसेच नूतन कार्यकारणीचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पञकार कचरुलाल बारहाते,संजय नाईक,मुस्तखीम बेलदार ,हाफिज बागवान ,प्रसाद जोशी,अनील चव्हाण ,सय्यद वसीम यांच्यासह सर्व सन्माननीय सदस्य तालुका पत्रकार संघ मानवत उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment