Sunday, December 31, 2023

मानवत येथील टेलरिंग मटेरियल दुकानाला आग लागुन लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक

मानवत येथील  टेलरिंग मटेरियल दुकानाला आग लागुन लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत शहरातिल देवी मंदिर रोड परीसरातील  नगरपरिषद च्या शॉपिंग सेंटर मधील जावेद अब्दुल मन्नान मनियार यांच्या टेलरिंग मटेरियल च्या दुकानाला दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजता इलेक्ट्रिक शॉट सर्किट मुळे आग लागल्याने दुकानातील टेलरिंग सामान काच बटन च्या शिलाई मशीन व दुकानातील  फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
 या घटनेची  माहिती मिळताच मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे,  सय्यद फय्याज ,रहिम सय्यद,चालक आकमार,बकंट लटपटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी रात्री दाखल झाले नगरपरिषद ची अग्निशामक दलाची गाडीस पाचारण करण्यात आले  अग्निशामक दलाचे सय्यद कलीम,मुकेश कुमावत ,देवेंद्र किर्तने यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण केले.
या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे आक्समात जळीत रजिस्टर ला नोद करण्यात आली असुन अधिक तपास नारायण सोळंके हे करीत आहे.


 

Saturday, December 30, 2023

शेख अनवर शेख रुस्तुम यांची मानवत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड.

शेख अनवर शेख रुस्तुम यांची  मानवत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या   तालुकाध्यक्ष पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
समाजसेवक शेख अनवर शेख रुस्तुम यांची  मानवत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अजीत दादा गट  तालुकाध्यक्ष पदी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यां उपस्थितीत  निवड दि.३० जानेवारी करण्यात आली .काहि दिवसापुर्विच अजितदादा पवार यांना मुंबई येथे भेटुन  शेख अनवर यांनी राष्ट्रवादी  पक्षात  प्रवेश केला होता .
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुरज चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष पदी  आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो या आशयाचे पञ रोहन सामाले पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी यांच्यां वतीने देण्यात आले आहे.शेख अनवर यांच्यां निवडिचे सर्व स्तरावरुन स्वागत  होत असुन त्यांना शुभेच्छा मिळत आहे .यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी , रोहण सामाले यांच्यांसह  मानवत तालुक्यातील युवक व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. समाजसेवक शेख अनवर यांना युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी भेटल्याने मानवत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाला बळ मिळणार हे माञ नक्की आहे.

Monday, December 11, 2023

चाळीस वर्षाच्या प्रतीक्षे नंतर डॉ. अंकुश लाड यांच्यां प्रयत्नामुळे मानवत शहरातील नागरिकांना मिळाले हक्काचे घर.

चाळीस वर्षाच्या प्रतीक्षे नंतर डॉ. अंकुश लाड यांच्यां प्रयत्नामुळे  मानवत शहरातील नागरिकांना मिळाले  हक्काचे घर

  मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील प्रभाग एक ,दोन , तीन तसेच  बिहारी काँलणी ,आंबेगाव नाका परिसर,गालीब नगर परीसरातील  नागरिकांना स्वत च्या नावावर पी टि आर नसल्यामुळे ४० ते ४५ वर्षापासून आपले हक्काचे घरे नव्हती  त्यांना  घरकुल योजनेचासुध्दा  लाभ मिळत नव्हता  अनेक अडि अडचणी चा सामना करावा लागत होता मागील चार वर्षाच्या कालावधीत  विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड यांच्या कानावर या नागरिकांचे समस्या गेल्यावर प्रभागातील नागरीकांना  भेटून डॉक्टर अंकुश लाड यांनी यांना शब्द दिला हक्काची घरे तुम्हाला पक्के बांधून देऊ व दिलेला शब्द अवघ्या काही वर्षातच पूर्ण करून गोरगरीब जनतेला आपल्या नावाच्या पी टी आर देऊन रमाई घरकुल , प्रधानमंञी  घरकुल योजने अंतर्गत पक्के घर  बांधून देण्यात आले आहेत या कार्याबद्दल गोरगरीब जनता डॉक्टर अंकुश लाड यांचे आभार मानत असुन ४० ते  ४५  वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक आता गुण्यागोविंदाने आपल्या पक्के घरात राहत आहेत.

Thursday, December 7, 2023

मानवत येथील हाजी ईमरान बागवान यांचे निधन

मानवत येथील हाजी ईमरान बागवान यांचे निधन

मानवत / प्रतिनीधी 
मानवत शहरातील टिपु सुलतान चौक खडकपुरा परिसरातील रहिवासी हाजी.मोहम्मद ईमरान हाजी.अब्दुल हन्नान बागवान वय ४९ वर्ष  यांचे अल्पशा आजाराने दि.६ डिसेबर रोजी  निधन झाले. मोठा कब्रस्तान येथे ६ डिसेंबर रोजी  दफनविधी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला.
हाजी ईमरान बागवान हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते सर्वांसोबत नेहमीच हसत खेळत राहायचे .
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,बहिण,भाऊ,मुलगी मुलगा असा मोठा परिवार आहे.
डॉ.एम.ए.रिजवान सर बागवान व विधीतज्ञ लुकमान बागवान यांचे ते मोठे बंधु होत.

Sunday, December 3, 2023

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव जी गायकवाड यांची मानवत येथे धावती भेट


राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव जी गायकवाड यांची मानवत येथे धावती भेट
मानवत / मुस्तखीम बेलदार 
माजलगाव दौऱ्यावर आले असता मा.श्री. माधवराव जी गायकवाड यांनी दि. ३ डिसेंबर रोजी मानवत येथे नवीन ओपनिंग झालेल्या हाळणे यांच्या राज फुटवेअर येथे धावती भेट घेऊन गोविंद हाळणे यांना शुभेच्छा दिल्या या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे व मानवत तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक बांधणी व जिल्ह्याच्या कार्यकारणी बद्दल आणि नुकतेच पेडगाव येथील नवीन बांधकाम झालेले गुरु रविदास प्रबोधन केंद्र या ठिकाणी दिलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीच्या स्थापनेच्या विषयी संवाद साधुन सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी माधवराव जी गायकवाड, यांचा व त्यांचे सहकारी तलाठी कैलास सूर्यवंशी साहेब, एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर बालाजी टोम्पे, आर्यन मोटर ड्राइविंग चे मालक पद्माकर असोले, इंजिनीयर विशाल बनसोडे, यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका मानवत च्या वतीने फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे ,कार्याध्यक्ष गोविंद हाळणे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, December 2, 2023

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन!

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे ३ डिसेंबर २०२३ रविवार रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. गोपाळ लाड दिव्यांग, जिल्हासंपर्क प्रमुख, मानवत
,कार्यक्रमाचे उपाध्यक्षस्थानी  मा.श्री. रणजित निर्मळ दिव्यांग, तालुका प्रमुख, मानवत उपस्थीत  राहणार आहे .
डॉ. श्री. निनाद दगडू ,डॉ.श्री.योगेश तोडकरी  उपस्थीत दिव्यांगाना मार्गदर्शन करनार आहेत तरी मोठ्यासंख्येने दिव्यांग बंधु भगीनीनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान आयोजक श्रीमती. कोमल सावरे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत व नगरपरिषद चे अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार 
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे ३ डिसेंबर २०२३ रविवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. गोपाळ लाड दिव्यांग, जिल्हासंपर्क प्रमुख, मानवत
,कार्यक्रमाचे उपाध्यक्षस्थानी  मा.श्री. रणजित निर्मळ दिव्यांग, तालुका प्रमुख, मानवत उपस्थीत  राहणार आहे .
डॉ. श्री. निनाद दगडू ,डॉ.श्री.योगेश तोडकरी  उपस्थीत दिव्यांगाना मार्गदर्शन करनार आहेत तरी मोठ्यासंख्येने दिव्यांग बंधु भगीनीनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान आयोजक श्रीमती. कोमल सावरे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत व नगरपरिषद चे अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.