राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव जी गायकवाड यांची मानवत येथे धावती भेट
मानवत / मुस्तखीम बेलदार
माजलगाव दौऱ्यावर आले असता मा.श्री. माधवराव जी गायकवाड यांनी दि. ३ डिसेंबर रोजी मानवत येथे नवीन ओपनिंग झालेल्या हाळणे यांच्या राज फुटवेअर येथे धावती भेट घेऊन गोविंद हाळणे यांना शुभेच्छा दिल्या या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे व मानवत तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक बांधणी व जिल्ह्याच्या कार्यकारणी बद्दल आणि नुकतेच पेडगाव येथील नवीन बांधकाम झालेले गुरु रविदास प्रबोधन केंद्र या ठिकाणी दिलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीच्या स्थापनेच्या विषयी संवाद साधुन सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी माधवराव जी गायकवाड, यांचा व त्यांचे सहकारी तलाठी कैलास सूर्यवंशी साहेब, एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर बालाजी टोम्पे, आर्यन मोटर ड्राइविंग चे मालक पद्माकर असोले, इंजिनीयर विशाल बनसोडे, यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका मानवत च्या वतीने फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे ,कार्याध्यक्ष गोविंद हाळणे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment