चाळीस वर्षाच्या प्रतीक्षे नंतर डॉ. अंकुश लाड यांच्यां प्रयत्नामुळे मानवत शहरातील नागरिकांना मिळाले हक्काचे घर
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील प्रभाग एक ,दोन , तीन तसेच बिहारी काँलणी ,आंबेगाव नाका परिसर,गालीब नगर परीसरातील नागरिकांना स्वत च्या नावावर पी टि आर नसल्यामुळे ४० ते ४५ वर्षापासून आपले हक्काचे घरे नव्हती त्यांना घरकुल योजनेचासुध्दा लाभ मिळत नव्हता अनेक अडि अडचणी चा सामना करावा लागत होता मागील चार वर्षाच्या कालावधीत विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड यांच्या कानावर या नागरिकांचे समस्या गेल्यावर प्रभागातील नागरीकांना भेटून डॉक्टर अंकुश लाड यांनी यांना शब्द दिला हक्काची घरे तुम्हाला पक्के बांधून देऊ व दिलेला शब्द अवघ्या काही वर्षातच पूर्ण करून गोरगरीब जनतेला आपल्या नावाच्या पी टी आर देऊन रमाई घरकुल , प्रधानमंञी घरकुल योजने अंतर्गत पक्के घर बांधून देण्यात आले आहेत या कार्याबद्दल गोरगरीब जनता डॉक्टर अंकुश लाड यांचे आभार मानत असुन ४० ते ४५ वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक आता गुण्यागोविंदाने आपल्या पक्के घरात राहत आहेत.
No comments:
Post a Comment