मानवत शिवसेना शहरप्रमुख पदी अनिल जाधव यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शिवसेना शहरप्रमुख पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी निष्टावंत व शिवसेना उपनेते खा.संजय जाधव यांचे अत्यंत विश्वासू असलेले आनिल जाधव यांची पुन्हा एकदा शिवसेना शहरप्रमुख पदी निवड झाली असून. या पूर्वी १९ फेब्रुवारी ११ रोजी शहरप्रमुख पदी नियुक्ती झाली होती. दरम्यान त्यांच्या एका वर्षाच्या शहरप्रमुखाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षासाठी उल्लेखनीय असे अनेक कार्य केले. त्यामध्ये त्यांनी आंदोलन, मोर्चे, रस्ता रोक, उपोषणे, रक्दान शिबीरे, पाणपोई तसेच कोरोना काळात कोविड मदत केंन्द्राद्वारे अनेक रूग्नांना रूग्णवाहीका व बेड उपलब्ध करुन दिले,फळे,काढा ईत्यादिंचे वाटप केले त्यांनी अनेक समाजहिताची कार्ये पार पाडली. सततची पक्षावर असणारी निष्ठा व कार्य तसेच अनिल जाधव यांचा मानवत शहर व मानवत तालुका दांडगा संपर्क असल्या कारणाने
अनिल जाधव यांची शिवसेना शहरप्रमुख पदी निवड झाली शिवसेना उपनेते खा.संजय जाधव,आ.राहुल पाटिल, माजी आमदार सौ.मिराताई रेंगे पाटील , परभणी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. प्रा.पंढरीनाथ धोंडगे ,जिल्हा प्रमुख विशाल कदम,जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर,जिल्हा प्रमुख सुरेश ढगे,महिला आघाडी सखुबाई लटपटे यांच्यांसह सर्वच स्तरातून अनील जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment