ताडबोरगाव येथील शिक्षक अब्दुल माजेद यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मानवत /मुस्तखीम बेलदार
परभणी आज तक एवं आझादभूमी वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल माजेद यांना देण्यात आला परभणी येथील फातिमा फंक्शन हॉल काद्राबाद येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले परभणी आज तक एवं व आझादभूमी वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या आयोजन करण्यात आले होते .
ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अब्दुल माजेद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण निवृत्त उपसंचालक आर एस मोगल, आयोजक महेमूद खान,मोईन खान यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जमील रंगरेज ,शिक्षक जुनेद खान,मोहम्मद कलीम, शेख जुनेद ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व गावकऱ्यांचे वतीने अब्दुल माजेद यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले.
No comments:
Post a Comment