मानवत येथील डॉ. हमीद खान यांची अशी हि समाजसेवा
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे खूप चांगल्या प्रकारे गोरगरीब गरजू रुग्णांवर उपचार होत आहे त्याचाच एक उदाहरण म्हणून मानवत शहरातील एक मतिमंद व्यक्ती ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आला होता त्याचे कपडे अगदी मळकट होते त्यांनी खूप दिवसापासून आंघोळही केली नव्हती अक्षरशा त्याची दाढी कठीण खूप वाढली होती ही बाब ग्रामीण रुग्णालय येथे कार्य करत असलेले डॉ. हमीद खान यांना लक्षात आली व डॉ हमीद खान, दवाखान्यातील आरोग्यकर्मचारी यांनी त्यांना चांगल्या प्रकारे आंघोळ घातली दाढी कटिंग केली डॉ. हमीद खान यांनी स्वखर्चातून त्यांस कपडे हि घेऊन दिले त्याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार केले. याचा एक व्हिडिओ समाज माध्यम वर खूप वायरल होत आहे सर्व स्तरातून मानवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र वर्मा व दवाखान्यातील सर्व डॉक्टर आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका , कर्मचारी यांचा सर्व स्तरातून मानवतकर कौतुक करत आहे.डॉ. हमीद खान हे अशाच प्रकारे गोरगरीब गरजु रुग्णांना स्वखर्चाने मदत करतात अशा समाजसेवी डॉक्टरांना रुग्णालयात कायमस्वरुपी टिकविण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे.
No comments:
Post a Comment