मानवत येथील फैजान बागवान व सुमेर बागवान याचां पहिला रोजा पुर्ण
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील समाजसेवक खय्युम बागवान सहारा यांचा मुलगा फैजान बागवान व पुतण्या सुमेर बागवान याने आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दि.२४ मार्च २०२४ रविवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेतहि मुस्लीम बांधव उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी फैजान बागवान व सुमेर बागवान यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु फैजान बागवान व सुमेर बागवान या भावडांनी
उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आई, वडील खय्युम बागवान सहारा, समाजसेवक हाफिज लतीफ , जुबेर भाई , इलियास पठान, इरशाद बागवान याच्यांसह
परिसरातील नागरीक या चिमुकल्यांचे कौतुक करुन शुभेच्छा देत आहे.
No comments:
Post a Comment