मानवत तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी कविता सत्यशिल धबडगे यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मागील पाच वर्षांपासून मानवत तालुका संजय गांधी निराधार समितीची नियुक्ती रखडली होती माञ नुकतीच नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे यात सदस्यपदी कविता सत्यशील धबडगे यांची निवड झाली आहे .
केंद्र शासन व राज्य शासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार घटकासाठी विविध योजना राबवले जातात अशा योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक स्वरूपात मासिक लाभ दिला जातो. यात राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो या समितीच्या अध्यक्षपदी अमोल गंगाधरराव कदम तर सदस्यपदी कविता सत्यशील धबडगे, मीरा विठ्ठल काळे, किशोर अशोकराव चव्हाण, अ. हबीब अ. कादर बागवान, निलेश विजयकुमार यादव, कल्याण रावसाहेब देशमुख, नागनाथ डिगांबरराव कुऱ्हाडे, शिवाजी गंगाधरराव वरखडे, ज्ञानेश्वर उत्तमराव भिसे यांची निवड करण्यात आली आहे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ५ सप्टेंबर रोजी नऊ सदस्यीय निराधार समिती नियुक्त केली आहे या निवडीवर आमदार राजेश विटेकर यांचे समर्थक युवानेते डॉ.अंकुशभाऊ लाड व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांचे शिफारशी वरुन हि निवड करण्यात आली आहे.या निवडिबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन होत असुन पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment