जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीरात सहभागी व्हा - शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव
मानवत / मुस्तखीम बेलदार
एक ऑक्टोबर जागतिक रक्तदान दिना निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खंडोबा मंदिर मित्र मंडळ मानवत यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातिल रक्त तुटवडा व रुग्णांची होणारी गैरसोय या कारणास्तव व सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिराचे उद्घाटन श्री.डॉ.नागेश लखमावार जिल्हा शैल्य चिकित्सक परभणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप बोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मानवत, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सौ.कोमल सावरे नगरपरिषद मानवत मुख्य प्रशासक व मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या शिबिरामध्ये ओम भगवती मित्र मंडळ , श्री संत सावता माळी मित्र मंडळ , रामनगर मित्र मंडळ , मॉर्निंग बॉईज ग्रुप , आदिशक्ती मित्र मंडळ , मृत्युंजय प्रतिष्ठान , शिव मित्र मंडळ , आर्ट ऑफ लिविंग परिवार , मोरेश्वर मित्र मंडळ , जय अंबे ग्रुप , शिवनेरी मित्र मंडळ ,राजपूत मित्र मंडळ , माय लाईफस्टाईल परिवार , व खंडोबा मित्र मंडळ मानवत या सर्व मित्र मंडळाचे सदस्य या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहेत या रक्तदान शिबिरामध्ये मानवत तालुक्यासह शहरातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव , पांडुरंग जाधव यांच्यासह सर्व खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment