किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन कोक्कर यांची निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत तालुका किराणा असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा सचिन कोक्कर यांची फेर निवड झाली असून ही निवड रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकित करण्यात आली.
व्यापारी महासंघाला सलग्न असलेली किराणा असोसिएशन ही संघटना गेल्या बऱ्याच वर्षांपासून व्यापारी महासंघाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. या संघटनेची कार्यकारिणी दरवर्षी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षीची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवारी दि.२९ सप्टेंबर रोजी जेष्ठ किराणा व्यापारी सुरेश काबरा
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते सचिन कोक्कर यांची अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष सचिन कोकर, उपाध्यक्ष बालाजी पोकळे, व्यंकटेश चिद्रवार, कोषाध्यक्ष कपिल खके, श्रीनिवास चांडक, सचिव गोविंद राठी, सहसचिव श्रीकांत माकोडे, नीरज मुंदडा, सल्लगार सदस्य सुरेश काबरा, राजू खके, बाळू चांडक, बाबू चांडक व गणेश कुमावत यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सचिन कोक्कर यांचे सर्व क्षेञातुन स्वागत होत असुन त्यांना पुढिल कार्यास शुभेच्छा मिळत आहे .
No comments:
Post a Comment