खय्युम बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी तथा अ.भा.कॉं.कमिटीचे सेक्रेटरी मा.श्री.कुनाल चौधरी व दिव दमन हवेलीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.महेशजी शर्मा हे विधानसभेच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते व पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या उपस्थितीत, परभणी येथे खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या आशयाचे पञ त्यांना यावेळी देऊन सत्कार करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
यावेळी मा.नगरसेवक सय्यद जमील, मिनहाज कादरी, अनंता मामा भदर्गे , अफसर अन्सारी, शाम भाऊ चव्हाण,वसीम कुरेशी , सय्यद आरिफ ,इलियास पठान ,इरशाद बागवान ,शोएब कुरैशी ,विक्रम सिंह दहे ,गणेश दहे ,अशफाक कुरैशी ,सोनू कुरैशी शाहिद पठान आदी उपस्थीत होते.
खय्युम भाई (सहारा)बागवान यांची मानवत अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजकिय ,सामाजिक क्षेञातुन या निवडिचे स्वागत होत असुन त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment