आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये - वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिक हुसेन शेख
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठवड्यात नूतन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. आशिक हुसेन शेख हे रुजू झाले आहेत. रुजू झाल्यापासून गेल्या आठ दिवसापासून रुग्णालयाचा कारभार ते सांभाळत आहेत .८ ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देताना कसूर करू नये असे आवाहन त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. गेल्या १३ वर्षांपासून मानवत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नरेंद्र वर्मा हे कर्तव्यावर होते. नुकतेच शासनाकडून त्यांची बदली होऊन त्यांना स्त्री रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले. त्यांच्या जागेवर मानवत येथे डॉ. आशिक हुसेन शेख हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातून आले. ८ दिवसापूर्वी रुजू झाल्यानंतर पूर्ण रुग्णालयाचे कामकाजाची त्यांनी पाहणी केल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात बदल करण्याची गरज असून आरोग्य सेवा पुरवताना कोणत्याही प्रकारचा कसूर करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आरोग्य बाबतीत आहेत त्या तळागाळातील माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी आली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिक हुसेन शेख यांच्या समवेत रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक , कार्यालयीन अधीक्षक संजय जोशी , वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजा पाटील , युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. कलीम शेख , राष्ट्रीय बाळ स्वस्थ अधिकारी डॉ. ललित कोकरे, डॉ. सुषमा भदर्गे, डॉ. प्रीती दीक्षित यांच्या सह औषध निर्माण अधिकारी शितल गायकवाड , मीनाक्षी कदम , इन्चार्ज अधिपाचारिका शिला पाटील , शुभांगी जोशी , रेखा फुलमोगरे, शिवप्रिया सोगे , प्रज्ञा जगझाप , लक्ष्मी सोनवणे , एकात्मिक सल्ला व केंद्र चे राजु कच्छवे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेंद्र टोम्पे , कपिल भरड , आरोग्य सेवक अकबर पठाण ,क्ष किरण अधिकारी विष्णू टेकाळे अधिपरीसेवीका रत्नमाला दाभाडे, रेणुका गिराम , सारिका आखाडे , एन ची डी विभागाचे करुणा ढेपे , बालिका सुरवसे , दीक्षा गायकवाड ,निशा वाकळे , राष्ट्रीय बालस्वस्थ फार्मासिस्ट सचिन कदम , सुनील खरात ,शुभम करवलकर ,ज्ञानेश्वर माकुडे ,बजरंग ढवळे ,मोहन कागडा , विठ्ठल धोपटे , रमेश लेंगुळे , कपिल सोनटक्के , महादेव पोटे , शैलेश उघडे, दीपक कुमावत व सुमित लाड आदी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment