मानवत येथे एम आय एम पक्षप्रवेश मेळाव्यात मोठ्यासंख्येने उपस्थीत रहा - तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथे ५ ऑक्टोबर शनीवार रोजी एम आय एम पक्षाच्यावतीने जाहीर पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला ,समीर बिल्डर तसेच परभणी जिल्हाध्यक्ष ॲड .इम्तियाज खान , शफिक भाई,हाफेज अलीशर उपस्थित राहून मार्ग दर्शन करणार आहेत तरी नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहान एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी केले आहे.
मागील अनेक वर्षा पासून मुस्लिम धर्माचे अनेक नेते ,युवक विविध पक्षात काम करत आहेत अनेक नेते मुस्लिम समाजाची मते घेऊन खासदार,आमदार मंत्री झालेत परंतु हेच नेते मुस्लिम समाजासाठी हिता चे कायदे न करता चुकीचे कायदे करणाऱ्याना समर्थन देत आहेत धर्म गुरु ना विनाकारण
अटक करणे मुस्लीम धर्मा विषयी वाईट बोलणे या नेत्यांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना साथ देत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचे खच्चीकरण होत आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष सोबत न जाता एम आय एम पक्ष नेहमी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत आहे. एम आय एम पक्षावर विश्वास ठेवून ५ आँकटोबंर शनीवार रोजी शेकडो कार्यकर्ते एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे असे एम आय एम पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक ऊर्फ अल्लारखां यांनी प्रसिद्धी पञिकेद्वारे कळविले आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहान मानवत तालुकाध्यक्ष शेख मुस्ताक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment