सावता माळी मंदिर परिसरातील नालीच्या कामाचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील संत सावता माळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात जात होते तसेच पाणी रस्त्यावर साचत होते. हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने राहणाऱ्या नागरिकांनी लावून धरत युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या बाबत मागणी केली होती याची दखल घेत शासन दरबारी यासाठी निधी मिळविणे करीता पाठपुरावा केला या कामासाठी निधी खेचून आणला व ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता या नाली कामाचे उद्घाटन युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
संत सावता माळी कमान ते राष्ट्रीय महामार्ग ६१ हा साधारण ८०० ते ९०० मीटर असलेला रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती झाली आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर पावसाच्या असो की नागरिकांचे सांडपाण्याचे दोन्ही पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची देखील दुरावस्था होत होती. म्हणून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मोठी नाली बांधून राष्ट्रीय महामार्ग ते संत सावतामाळी कमान या दरम्यान नाली झाल्यास रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे पाणी येणार नाही परिणामी ते पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही यामुळे या परिसरातील नागरीक वारंवार डॉ. अंकुश लाड यांच्या संपर्कात होते. नाली नसल्यामुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांनी डॉ. अंकुश लाड यांना दिली. या मागणीचा गांभीर्याने विचार करत डॉ. लाड यांनी शासनाकडून या कामासाठी निधी खेचून आणला ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या नाली कामाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी डॉ अंकुश लाड यांनी या कामाचे उद्घाटन केले तर प्रभागाचे नगरसेवक गिरीशशेठ कत्रुवार , दत्ताभाऊ चौधरी ,गणेश कुमावत ,संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कोक्कर , बळीराम रासवे ,इंजिनीयर बबन राऊत साहेब , ज्ञानेश्वर रासवे, नारायण रासवे , भिकाजी रासवे ,नामदेव कोकर ,व्यंकटेश चौधरी ,श्रीधर कोकर , उद्धव रासवे सर,वसंत मोरे, गणपत सिसोदे, डॉक्टर कहकर साहेब ,श्री मुंजाभाऊ राऊत, प्रा. गजू रासवे, मगर साहेब, देवा भरड, सुनील रासवे, कृष्णा रासवे, महेश वाघमारे, बालाजी रासवे ,मधुकर रासवे, मनोहर राऊत ,श्री सोपान वाघमारे, गणेश वाघमारे ,आकाश राऊत, ओम राऊत ,गणेश गोरे ,अमोल चौधरी ,कृष्णा रासवे, पप्पू डाके, हनुमान चौके शिवा शेंडगे व संत सावता माळी नगरातील सर्व रहिवासी यावेळी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मानवत नगरीचे भाग्यविधाते डॉक्टर अंकुश भाऊ लाड गिरीश कञुवार दत्ताभाऊ चौधरी गणेश कुमावत यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानन्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव रासवे सर यांनी केले तर आभार दत्ताभाऊ चौधरी यांनी मानले.
No comments:
Post a Comment