Saturday, November 29, 2025

बिलाल मिलन व असलम बेलदार यांची निवडणूक प्रचारात आघाडी

बिलाल मिलन व असलम बेलदार यांची निवडणूक प्रचारात आघाडी

मानवत/प्रतिनिधी

मानवत शहरातील नामांकित उद्योजक ईणुसभाई मिलन यांचे सुपुत्र, युवा उद्योजक व सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेले बिलाल सेठ मिलन तसेच समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिलेले अनीसभाई बेलदार यांचे सुपुत्र, युवानेते असलम बेलदार या दोघा उच्चशिक्षित युवकांवर विश्वास दाखवत शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे विरोधकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आता निवडणुकीस काहीच दिवस शिल्लक असताना बिलाल मिलन व असलम बेलदार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत विकासाच्या आश्वासनांवर नागरिकांना मतदानाची विनंती ते करत आहेत.

यामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक चुरशीची बनली असून बिलाल मिलन व असलम बेलदार यांना युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Thursday, November 27, 2025

मानवत शहराला विकास निधी कमी पडू देणार नाही – खासदार श्रीकांत शिंदे


मानवत शहराला विकास निधी कमी पडू देणार नाही – खासदार श्रीकांत शिंदे

[] मानवत येथे शिवसेना–भाजप युतीची शक्तिप्रदर्शन सभा []

मानवत /  प्रतिनिधी
मानवत नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक  च्या पार्श्वभूमीवर शिवसेना–भाजप महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अंजली महेश कोक्कर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक २७ नोव्हेंबर रोजी मानवत शहराच्या मेन रोडवर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती .
सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंद भरोसे, पक्ष निरीक्षक आनंद जाधव व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महायुतीतर्फे तयार करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सभेत आनंद भरोसे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अंजली महेश कोक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मानवत शहरातील विकासकामे वेगाने करण्यासाठी स्थिर सत्ता आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सौ. प्रेरणा वरपूडकर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही महायुतीचे भक्कम नेतृत्व, विश्वासार्ह विकासनियम व पारदर्शक प्रशासन यावर भाष्य करत नागरिकांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
मुख्य पाहुणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या प्रभावी भाषणात मानवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पाठबळ देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
ते म्हणाले,महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मानवत शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, आरोग्य सुविधा, क्रीडा संकुल अशा सर्व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक त्या सर्व निधीची कमतरता भासणार नाही. मानवतचा विकास ही आमची जबाबदारी आहे.
त्यांनी मानवत शहराला मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे आश्वासन देत मानवत शहराला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत नागरिकांना युतीच्या उमेदवारांना विजयासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
सभेला महिला, युवक, व्यापारी, विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मेन रोड दुमदुमला होता.
सभेनंतर मानवत शहरातील निवडणुकीची रंगत आणखी चढली असून प्रभागनिहाय चर्चा, मतदारसंघातील समीकरणे आणि युतीच्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

साथ सोबत निवासी अस्थिव्यंग विद्यालय मानवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा

साथ सोबत निवासी अस्थिव्यंग विद्यालय मानवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा
मानवत – प्रतिनिधी
साथ सोबत निवासी  अस्थिव्यंग विद्यालयात मानवत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना संविधानाचे महत्त्व व त्यातील मूल्यांची सविस्तर माहिती दिली.
या निमित्त शाळेत रंगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने व सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सोफिया मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन साजिद सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा

मानवत युवा पॅंथर च्या वतीने भारतीय  संविधान दिन उत्साहात साजरा
मानवत प्रतिनिधी
विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांनी २ वर्षे११महिने १८ दिवस राबून या देशाच संविधान लिहिलं.रंकाला राजा बनण्याचा आणि बनवण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पतंगे साहेब(पोलीस उप निरीक्षक),शरीफ भाई(पोलीस नायक),लिपारे सर,घाटूळे सर,पैंजने सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलास खरात सर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले.बोलतांना ते पुढे म्हणाले की,या देशाच सार्वभौमत्व फक्त भारतीय संविधाना मुळेच टिकून आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विलास खरात सर व युवा पॅंथरचे सन्माननीय पदाधिकारी  रविभाऊ पंडीत, नागसेन भदर्गे,दिपक ठेंगे, पप्पू गायकवाड,बिजू खरात, आकाश खंदारे,बाळा धबडगे आणि सर्व युवा पँथर्स मानवत, यांच्या सहकार्यातून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.