बिलाल मिलन व असलम बेलदार यांची निवडणूक प्रचारात आघाडी
मानवत/प्रतिनिधी
मानवत शहरातील नामांकित उद्योजक ईणुसभाई मिलन यांचे सुपुत्र, युवा उद्योजक व सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेले बिलाल सेठ मिलन तसेच समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिलेले अनीसभाई बेलदार यांचे सुपुत्र, युवानेते असलम बेलदार या दोघा उच्चशिक्षित युवकांवर विश्वास दाखवत शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे विरोधकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आता निवडणुकीस काहीच दिवस शिल्लक असताना बिलाल मिलन व असलम बेलदार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत विकासाच्या आश्वासनांवर नागरिकांना मतदानाची विनंती ते करत आहेत.
यामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक चुरशीची बनली असून बिलाल मिलन व असलम बेलदार यांना युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
No comments:
Post a Comment