Friday, March 27, 2026
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड
Thursday, March 26, 2026
मानवत येथील प्रभाग क्र. ३ मध्ये एस.आय.आर. कॅम्प चे आयोजन
Wednesday, March 25, 2026
सोनुळा येथे रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रम संपन्न
Saturday, March 21, 2026
रमजान ईद निमित्त मानवत येथे सुनील शेट्टी (अन्ना) यांची सदिच्छा भेट
Sunday, March 15, 2026
आठ वर्षीय शेख सलीम यांचा पहिला रोजा संपन्न
आठ वर्षीय शेख सलीम यांचा पहिला रोजा संपन्न
नारेगाव / प्रतिनिधी
रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवून उपवास करतात. विशेषतः लहान मुलांसाठी हा एक महत्त्वाचा आध्यात्मिक आणि मानसिक अनुभव असतो या निमित्त नारेगाव येथील अवघ्या आठ वर्षांच्या शेख सलीम शेख साजीद वय ८ वर्ष यांनी तपत्या उन्हात दि.१४ मार्च रोजी आपल्या आयुष्याचा पहिला रोजा ठेवत धार्मिक श्रद्धेचे अनोखे उदाहरण सादर केले आहे.
शेख सलीम यांनी आपल्या कुटुंबासोबत रोजा ठेवण्याचा निर्धार केला आणि संपूर्ण दिवस उपवास करून रमजानच्या पवित्रतेची अनुभूती घेतली. त्यांच्या या धैर्याने आणि श्रद्धेने संपूर्ण कुटुंबासह समाजातील लोकही भारावून गेले आहेत.
शेख सलीम यांच्या या धार्मिक जाणीवेचे त्यांचे आजी, आजोबा हाजी शेख जफर , शेख चाँद ,आई,वडील शेख साजीद , मामा शेख तारेख ,चुलते शेख वाजीद , शेख आरेफ ,शेख वसीम , सय्यद अरबाज , सय्यद दानिश तसेच मित्र मंडळांकडून विशेष कौतुक करत शुभेच्छा देण्यात आल्या आहे त्यांच्या या समर्पणामुळे परिसरात आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेख सलीम याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Thursday, March 12, 2026
परभणी शहरातील जिंतूर रोडवरील बॅरिकेट्स हटवण्याची नगरसेवकांची मागणी
Sunday, March 1, 2026
आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात [] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश[]
आंबेडकर नगर पश्चिम भागातील जागा मोजणीला अखेर सुरुवात
[] डॉ. अंकुश लाड यांच्या पाठपुराव्याला यश []
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील आंबेडकर नगर पश्चिम भागातील गेल्या २० ते २५ वर्षांपासून रखडलेला जागा मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या प्रभागातील नागरिकांकडून वारंवार युवा नेते तथा उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्याकडे या विषयाबाबत मागणी करण्यात येत होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर या जागेच्या मोजणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या कामाची सुरुवात डॉ. अंकुश लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली. अनेक पिढ्यांनी ज्या कामाची प्रतीक्षा केली, ते काम आता पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसरात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेवक राजू भैय्या खरात, नगरसेवक गणेश भाऊ उगले, ओमभाऊ सिद्धार्थ ढाले, समाजसेवक असद खान, नगर परिषद मानवत येथील अभियंते तसेच आंबेडकर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, February 27, 2026
मानवत शहरातील अवाजवी करवाढीला डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने लगाम
मानवत शहरातील अवाजवी करवाढीला डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने लगाम; चतुर्थ वार्षिक कर आकारणी स्थगित!
[] मानवत नगरपरिषद स्तरावर ऐतिहासिक ठराव मंजूर []
मानवत / मुस्तखीम बेलदार
प्रशासकीय काळात मानवत नगर परिषदेत प्रशासकामार्फत करण्यात आलेली चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असल्याने ही प्रक्रिया नगरपरिषद स्तरावर तात्काळ स्थगित करण्याचा आणि त्यात मूलभूत सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नवनिर्वाचित कार्यकारिणीने मंजूर केला. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते डॉ. अंकुश बालाजी लाड यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. तसेच व्यावसायिक मालमत्ता वरील दुप्पट कर आकारणी रद्द करून ती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वार्षिक भाडे मूल्य ही वास्तववादी पातळीवर कमी केले जाणार आहे.
नगरपरिषद मानवत हद्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप यादी आणि त्याबाबतचा प्रशासकीय ठराव क्र. २९३ (दि. ०६/०२/२०२५) हा शहरातील आर्थिक परिस्थिती आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सन २०२६-२७ ते २०२९-३० या चतुर्थ वार्षिक कालावधीसाठी कर आकारणीची प्रारूप यादी शहराच्या भौगोलिक परिस्थितीशी आणि नागरिकांच्या आर्थिक क्षमतेशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेमुळे जनसामान्यांमध्ये असंतोष असून, नगरपरिषद प्रशासनाने स्थानिक पातळीवरच या प्रक्रियेचा फेरविचार करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सुधारित ठराव मंजूर करण्यात येत आहे:
मंजूर ठरावरील महत्त्वाचे मुद्दे:
१) सध्या सुरु असलेली चतुर्थ वार्षिक कर आकारणीची प्रक्रिया नगरपरिषद स्तरावर स्थगित करण्यात येत आहे. सुधारणा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊ नये.
२) झोन निश्चित करताना झालेल्या त्रुटी आर्थिक स्तरानुसार झोन निश्चीती करताना संबंधित एजन्सीने फेरसर्वेक्षण करावे.
3) करयोग्य मूल्यावर आकारलेला करदर हा 'क' वर्ग नगरपरिषदेसाठी जास्त आहे. नागरिकांवरील बोजा या नवीन कर दराने कमी व्हावा.
४) व्यावसायिक मालमतांसाठी असलेली दुप्पट कर आकारणी रद्द करून ती निवासी दराच्या (दीडपट) करण्यात यावी.
५) वार्षिक भाडेमूल्याची गणना करताना सध्याचे बाजारभाव आणि मालमतेची स्थिती यांचा वस्तुनिष्ठ विचार करून त्यात कपात करण्यात यावी.
६) नगर परिषद प्रशासनाने प्रभागनिहाय विशेष शिबिरे आयोजित करावीत. प्रत्येक नागरिकाच्या हरकतीवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करावी आणि सुधारित दराने आकारणी करावी.
७) सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था, स्वातंत्र्य सैनिक व दिव्यांग यांना नियमानुसार योग्य ती करसवलत देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
ठरावः नगरपरिषद प्रशासनाने वरील सर्व सुधारणांचा अंतर्भाव करूनच नवीन सुधारित प्रारूप यादी तयार करावी. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही करवाढ लागू करू नये. या सुधारणा होईपर्यत सध्याची प्रक्रिया पूर्णतः स्थगित राहील. सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, संबंधित एजन्सीने तयार केलेली सुधारित प्रारूप यादी व सविस्तर प्रस्ताव पुनश्च नगरपरिषद सभागृहाच्या पटलावर ठेवावा. सभागृहाच्या अंतिम मान्यतेशिवाय आणि चर्चेविना ही करवाढ लागू करण्यात येवु नये, नगरपरिषद प्रशासनाने वरील सर्व प्रक्रियेचे पालन करावे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.
Thursday, February 19, 2026
आमसभेपूर्वी नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत - डॉ अंकुश लाड
आमसभेपूर्वी नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत - डॉ अंकुश लाड
मानवत/ प्रतिनिधी
२७ फेब्रुवारीला कर निर्धारण प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आमसभेपूर्वी जर नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवले तर या आमसभेत नागरिकांच्या आक्षेपामुळे आम्हाला कर निर्धारण प्रक्रियेला स्थगिती प्रस्ताव आणण्यास बळकटी येईल. नागरिकांनी जास्तीत जास्त आक्षेप नोंदवावेत असे आव्हान मानवत नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी मानवत शहरातील जनतेस केले आहे.