Friday, June 19, 2026

२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा - डॉ.शेख आदिल

२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा - डॉ.शेख आदिल
मानवत / मुस्तखीम बेलदार
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत रविवार दि. २८ जून २०२६ रोजी पोलिओ रविवार आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येणार असून, कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालकाला यापूर्वी पोलिओचे डोस दिले असले, तसेच बालक किरकोळ आजारी असले किंवा नुकतेच जन्मलेले असले, तरीही त्याला पोलिओचे दोन थेंब पाजणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे व आपल्या परिसरातील आरोग्य कर्मचारी किंवा लसीकरण केंद्रांवर जाऊन बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन मानवत ग्रामीण रुग्णालयाचे  डॉ. शेख आदिल यांनी केले आहे.
Uploaded Image

No comments:

Post a Comment