Friday, June 26, 2026

शेख रुस्तुम सर  यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा ३० जून रोजी

  शेख रुस्तुम सर  यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा ३० जून रोजी 

मानवत / मुस्तखीम बेलदार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरवाडी (ता. मानवत, जि. परभणी) येथील प्राथमिक शिक्षक शेख रुस्तुम शेख करीम हे दि. ३० जून २०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या गौरवशाली शैक्षणिक सेवेला मानवंदना म्हणून त्यांचा सेवापूर्ती सन्मान समारंभ मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जि.प. प्राथमिक शाळा, हटकरवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. आ. माणिकराव आंबेगावकर राहणार असून, श्री. रामराव लोहट दादा (संस्थापक अध्यक्ष, म.रा.प्रा. शिक्षक संघ, परभणी) हे प्रमुख शुभहस्ते उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. मेघाताई मोहनराव फड, सौ. वैशाली पंकज आंबेगावकर (शिक्षण सभापती, जि.प. परभणी), सौ. गीतांजली दत्तात्रय जाधव (जि.प. सदस्य), सौ. सरस्वती गोविंद नाईक (पं.स. सदस्य), श्री. सुनील कुमार तोष्णीवाल (गटशिक्षणाधिकारी, मानवत), श्री. मधुकरराव कदम (ज्येष्ठ शिक्षक नेते), श्री. बाबुराव मुकनर (केंद्रप्रमुख), श्री. किशनराव ईदणे (राज्य सरचिटणीस, म.रा.प्रा. शिक्षक संघ, महाराष्ट्र), श्री. शामसुंदर मोकमगोड (अण्णा) (सरचिटणीस, म.रा.प्रा. शिक्षक संघ, जिल्हा शाखा परभणी) तसेच श्री. शहानूर खाँ पठाण (पं.स. सदस्य) यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, तंटामुक्ती समिती, सर्व ग्रामस्थ आणि सर्व शिक्षकवृंद, हटकरवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवानिवृत्त शिक्षक शेख रुस्तुम शेख करीम यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Uploaded Image

No comments:

Post a Comment