Saturday, August 29, 2026

समाजसेवक डॉ. जगदीश शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त जी-वन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे  रक्तदान शिबिर

समाजसेवक डॉ. जगदीश शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त जी-वन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे  रक्तदान शिबिर
मानवत / प्रतिनिधी
परभणी जी-वन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा समाजसेवक डॉ. जगदीश शिंदे व गजानन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबिर दि. २९ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जी-वन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी व इष्टमित्रानी  सहभाग नोंदवला रक्तदान शिबिराचे आयोजन जी-वन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते , श्री हनुमान साहेब ब्लड बँक, परभणी यांचे रक्तदान शिबिरास सौजन्य लाभले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन  नेहमी रक्तदान करावे असे आवाहन डॉ. जगदीश शिंदे यांच्यावतीने यावेळी करण्यात आले.

Uploaded Image

No comments:

Post a Comment