राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सुनावणीस उपस्थीत राहण्याचे राज बेलदार संघटनाचे आवाहान
परभणी /प्रतिनीधी
महाराष्ट्रातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुर्जर, बेलदार, झाडे, डोंगरी व कलवार या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे निवेदने प्राप्त झालेली आहेत. सदर निवेदनाच्या अनुषंगाने मा. आयोगाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी १२.०० वाजता सुनावणी आयोजित केली आहे. तरी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या जाती संघटनाच्या सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यासहित सुनावणीस उपस्थित राहायचे आहे या संबधी राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि हे बेलदार समाजाची बाजु आयोगासमोर मांडणार असुन ज्यांना सोबत यायचे आहे त्यांनी ९०११६३३७०४ या क्रंमाकावर संपर्क साधावे व मोठ्या संख्येने बेलदार समाजबांधवानी यावेळी उपस्थीत राहण्याचे आवाहान समाज बांधवाना राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे
No comments:
Post a Comment