मराठा आरक्षण मिळत नाहि तो पर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
[] मानवत तालुक्यातील सावळी येथील सकल मराठा समाजाचा निर्णय [] मानवत / मुस्तखीम बेलदार
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मानवत तालुक्यातील सावळी येथे राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे या संदर्भात मानवत तहसीलदारांना देखील माहिती देण्यात आली आहे दरम्यान गावबंदी संदर्भात सावळी पाटीवर पोस्टर देखील लावण्यात आले आहे मानवत तालुक्यातील सावळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे तोपर्यंत त्या लढ्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सावळी येथील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्याचा धाडशी निर्णय घेण्यात आला आहे यासाठी सावळी पाठीवर राजकीय पुढार्यांना गावबंदी असल्याचे बॅनर देखील लावण्यात आले आहे या बॅनरला कोणाकडून काही हानी झाली किंबहुना दगड मारणे, पोस्टर फाडणे अशा प्रकारचे कृत्य झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी गावात पुढाऱ्यांना बोलवणाऱ्या व्यक्तीची राहील अशी माहिती तहसील कार्यालयाला सावळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे या वेळी मयूर काळे, शंकर काळे, संजय काळे, हनुमान काळे, ज्ञानोबा काळे, सोनू काळे, आकाश काळे, कृष्णा काळे, भरत काळे, पुरुषोत्तम काळे, केशव काळे, अमोल काळे, अरुण काळे यांच्यासह सावळी येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment