खासदार संजय जाधव यांचा मानवत येथील शिवसैनिकाच्या वतीने भव्य सत्कार
मानवत / मुस्तखीम बेलदार
खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदी निवड करण्यात आली त्या निमित्ताने मानवत चे माजी शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकाच्या वतीने खासदार साहेबांच्या त्यांच्या परभणी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी अनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत मानवत शहरातील अडचणीचे प्रश्न खासदार साहेबांसमोर मांडले.खासदार साहेबांनी तात्काळ दखल घेत काही प्रश्न मार्गी लावले व नवरात्र उत्सव मिरवणुकीचा मार्ग मोकळा केला. खासदार साहेबांनी नंतर सर्वांना मार्गदर्शन केले.
नंतर साहेबांना फेटा , शाल , पुष्पहार , गुच्छ श्रीफळ व फटाक्याची अतिशबाजी सह भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment