डॉ.अंकुश लाड मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरात रावण दहन करण्याची परंपरा गेल्या ५ वर्षांपासून डॉ अंकुश लाड मित्र मंडळ जपण्याचे काम करीत असून येथील नागरिकांचाहि ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयच्या प्रांगणातील भव्य मैदानावर रावण दहन कार्यक्रम होणार असुन त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
नवरात्र उत्सवात दसऱ्याच्या दिवशी मानवतकरांसाठी हा आकर्षणाचा विषय ठरत असतो. यात अबाल वृद्ध यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यातच या वर्षी मेघनाद व कुंभकर्ण यांच्या प्रतिकृती सोबत हा रावन दहण होणार आहे या वर्षी चे रावणदहन चे मुख्य आकर्षण ५१ फूट रावनाच्या प्रतिकृतीसोबत मेघनाद व कुंभकर्ण यांच्या देखील प्रतिकृती चे दहन होणार असून या वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी रामलीला होणार आहे तसेच भावगीत व भक्ती गीत सादर करणारे गायन संच सोबत पुणे येथील आकर्षक आतिषबाजी चा देखावा सादर करण्यात येणार .
या रावणाचे दहन महामंडलेश्वर श्री श्री १००८ ह भ प मनिषानंदजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
मानवत शहरातील नागरिकांनी शहरातील नेताजी सुभाष विद्यालयाच्या पाठीमागील रामलीला मैदानावरिल रावणदहन कार्यक्रमास उपस्थत राहण्याचे आव्हान युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment