Monday, January 29, 2024

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 

मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जमील रंगरेज यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व झैन फाउंडेशन परभणी द्वारा आयोजित केलेले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.२८ जानेवारी रविवार रोजी परभणी येथे खासदार डॉ.फौजिया खान, गौस झैन,  शिक्षणअधिकारी संजय ससाने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले या निमित्त शिक्षक जमील रंगरेज याचां  ताडबोरगाव येथील  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य  सर्व शिक्षक व गावकरी मंडळी यांच्या वतीने जमील रंगरेज यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

Sunday, January 28, 2024

राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्यास उपस्थीत राहण्याचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांचे आवाहान

संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्यास उपस्थीत राहण्याचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांचे आवाहान

मानवत / मुस्तखीम बेलदार 

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष 
समाज भूषण सहादू ठोंबरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभानिमित्त संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्याचे भव्य आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी च्या वतीने ३१ जानेवारी रोजी जागृती मंगल कार्यालय वसमत रोड परभणी येथे  करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चर्मकार महासंघ
तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन 
मा. रघुनाथ गावडे ( भा.प्र.से. )
जिल्हाधिकारी  परभणी ,
मा.ज्ञानेश्वर कांबळे 
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,
मा.अशोकरावजी माने,
चेअरमन देशभक्त रत्नाप्पा कुंभार सूतगिरणी कोल्हापूर तर
प्रमुख पाहुणे म्हणुन 
मा.डॉ. राहुल पाटील
विधानसभा सदस्य परभणी हे उपस्थीत राहणार आहे तसेच 
विशेष उपस्थिती मा.माधवराव गायकवाड
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,प्रा. डॉ. शशिकांत सोनवणे
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,मा. संभाजी वाघमारे संपर्कप्रमुख विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रा. डॉ. गोपाल बच्छिरे
राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघ
मा. गजानन भटकर
कार्याध्यक्ष विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपस्थीत राहणार आहे 
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन 
सौ संगीता पराते विभागीय व्यवस्थापक. लीडकॉम ,मा. संभाजी एस पोवार
 सी. ए. कोल्हापुर हे उपस्थीत राहणार.
 या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समाज भुषण सहादु ठोंबरे यांच्यां सेवापुर्ति निमित्त त्यांचा  सत्कार करुन समाजातील होतकरू युवक युवती यांना उद्योग व्यवसायाची माहिती व तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळ महिला सक्षमीकरण या आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची सर्व माहिती या मान्यवरांच्या मार्फत दिली जाणार आहे
 तरी या संधीचा चर्मकार समाजातील सर्व बंधू भगिनींनी लाभ घ्यावा आणि उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावे असे
 आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघांचे परभणी  जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या वतीने करण्यात आले आहे

Thursday, January 25, 2024

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी

सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्याची मानवत येथील बौध्द समाज बांधवाची मागणी
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने  सुरु असुन या सर्वेक्षणामध्ये बौध्द जातीचा उल्लेख येत नसल्यामुळे हा सर्वे  बौध्दांवर अन्याय करणारा आहे सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावा या मागणीचे निवेदन दि.२५ जानेवारी रोजी मानवत शहरातील बौध्द समाज बांधवाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार रंजित सिंह कोळेकर यांच्यां मार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्रात दिनांक २३ जानेवारी पासून सुरु झाले असून सदरील प्रगणक यांच्या मोबाईल अँपमध्ये हिंन्दु महार असा जातीचा कॉलम येत असून सदरील कॉलम हा चुकीचा व बौध्दांवर अन्याय करणारा आहे. तसेच  दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग आयोगाने अनुसुचीत जातीच्या कॉलम मध्ये नवबौध्दांचा व बौध्दांचा धर्मातरापुर्वीची जातीची नोंद करावी असे आदेश दिले आहेत हा आदेश आमच्यावर अन्याय करणारा आहे करीता सदरील आदेश रद्द करुन सुधारीत आदेश काढण्यात यावे असे न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलने करावी लागतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील  मराठा आरक्षणच्या सर्वेक्षणाच्या कॉलम मध्ये बौध्द असा उल्लेख करण्यास वरिष्ठांना कळवावे असे निवेदनात  नमुद केले आहे.
निवेदनावर आनंद मामा भदर्गे , जनार्दन कीर्तने , छगन भदर्गे , शैलेश वडमारे , संपत पंडित , दीपक ठेंगे, रवी पंडित , राहुल भदर्गे, राजू भैय्या खरात , सत्यशील धबडगे ,फकीरा सोनवणे  ,गौतम जमदाडे , बाबासाहेब सोनटक्के यांच्यांसह 
 बौध्द समाज बांधवाच्यां स्वाक्षरी निवेदनावर आहे.

Wednesday, January 17, 2024

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न

मानवत शहरातील बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते संपन्न 

मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे उदघाटन युवानेते विकासपुरुष  डॉ.अंकुश लाड याच्यां शुभ हस्ते दि.१७ जानेवारी रोजी करण्यात आले. अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मिटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानवत शहरातील शासकीय विश्रामगृह ते महाराणा प्रताप चौक हा अडीच कि. मी. लांबीचा एकमेव मुख्य रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण  करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. कपडा मार्केट, भाजी मार्केट असून यासह  महापुरुषांच्या जयंती मिरवणूक,गणेश मिरवणूक या मार्गाने होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर होत होता.नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन डॉ.अंकुश लाड यांनी तात्काळ पुढाकार घेत डांबरीकरणासाठी  निधी मंजुर करून आणला. सर्व प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रिया पार पडून बुधवार दि. १७ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कामाचे उदघाटन करण्यात आले. हे काम कॅट आय  या आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. यामुळे धूळीची समस्या भेडसावणार नाही.

या वेळी विजयकुमारजी कत्रुवार, जयकुमारजी काला, प्रकाश शेठ पोरवाल, श्रीकिशनजी सारडा, संजयजी लड्डा, अश्रोबा कुऱ्हाडे पाटील , ज्ञानेश्वर मोरे,सुरेश शेठ कडतन,गणेश मोरे पाटिल, बाबुराव हाळनोर, मुंजाभाऊ तरटे, डॉ योगेश तोडकरी, शिवाजी पाटील ,गणेश कुमावत ,राजकुमार खरात, किरण बारहाते, दत्ता चौधरी,मोहन लाड, बालाजी कुऱ्हाडे, शफिक भाई बागवान, नागनाथ कुऱ्हाडे, नगरा अभियंता सय्यद अन्वर  ,बळीराम दहे, ओम भाऊ चव्हाण,पंकज लाहोटी,विजय कीर्तनकार, बाबा कच्छवे ,योगेश जाधव ,डॉ विष्णू काकडे, सूर्यकांत कडतन, आप्पा भिसे, विठ्ठलराव पवार ,संजय नाईक , सचिन मगर याच्यांसह  शहरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड

ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी    प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांच्यां हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली आहे.  यावेळी  प्रदेश सरचिटणीस राजेश गायकवाड उपस्थीत होते.ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन शुभेच्छा मिळत आहे.

Sunday, January 14, 2024

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन .

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मकरसंक्रांत सन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडविण्याचे वेध सुरु होते मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने आपल्या देशाची संपत्ती असेलल्या पक्षांची काळजी घ्यावी पतंग उडवतांना मांज्याचा नॉयलॉन दोराचा वापर करु नये असे आवाहन मानवत पोलीस स्टेशनचे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी केले आहे.

मकरसंक्रात हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्वाचा सण या सणामध्ये महिला वाण वाटत ऐकामेकांना शुभेच्छा देतात तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जातो, अनेकदा पतंग झाडांवर अडकल्या नंतर युवक पतंग तसाच झाडावर सोडून देतात त्या झाडांवर पतंगाचा मांजा अडकून राहिल्याने कित्येकदा पक्षी त्या मांजांमध्ये अडकण्याचे प्रकार घडून पक्षांना अपंगत्व सुद्धा येते तर काही पक्षांचा जीव देखील

जात असतो त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोकळ्या जागी घ्यावा तसेच झाडांवर पतंग अथवा मांजा अडकणार नाही याची काळजी घेऊन कोठे झाडांवर मांजे अडकले तर ते तातडीने काढून घ्यावे जेणे करुन आपल्या देशाची संपत्ती असलेल्या पक्षांना हानी पोहचणार नाही  आपण आपले दुकानात पतंगाचा नायलॉन मांज्या विक्री करतांना अथवा साठवणुक करतांना मिळुन आल्यास आपले विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईंल असे प्रसिद्धी पञिकेद्वारे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी कळविले आहे.


Monday, January 8, 2024

शेख समीर यांची शिवसेना अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्षपदी निवड

शेख समीर यांची शिवसेना अल्पसंख्यांक   मानवत तालुकाध्यक्षपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मानवत येथील समाजसेवक शेख समीर शेख शफियोदिन यांची  अल्पसंख्यांक  शिवसेना मानवत  तालुकाध्यक्ष पदी निवड  शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान  यांच्यां प्रमुख उपस्थितीत  दि.८ जानेवारी रोजी शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय  पाथरी येथे करण्यात आली .
खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यां आदेशाने अल्पसंख्यांक मानवत तालुकाध्यक्ष पदी  आपली नियुक्ती करण्यात येत असून आपण पक्षाचा अधिक विस्तार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार तळगाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल, पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो असे प्रतिपादन  प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान यांनी यावेळी  केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  निवडिचे पञ शेख समीर यांना देऊन त्यांचा सत्कार करुन पुढिल कार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी लाल खान  जिल्हाध्यक्ष  अल्पसंख्यक ,आसेफ खान  अल्पसंख्यक प्रदेश सचिव ,दादा साहेब टेंगसे जिला परिषद माजी सभापति ,चक्रधर उगले माजी जिला परिषद सदस्य ,हसीब खान अल्प संख्यक प्रदेश उपाध्यक्ष ,शाकेर भाई ,युसूफोद्दीन अंसारी ,नाना टकलकर ,
मेहराज खान ,मोइन अंसारी,साजिद अली राज,शेख इरफान ,अनिल पाटिल,
हबीब खान ,सतीश वाकडे ,हाजी, खुरेशी 
हनीफ खुरेशी ,अहमद अतार, फारुख  अंसारी ,मुबारक चाउस,युनुस कुरेशि,आनंत नेब,अनिल ढवले ,शकील बेग 
आलम, अजीज बागवान ,
समीर मकसूद आदीसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक  उपस्थीत होते.