Sunday, January 14, 2024

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन .

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या पो.नि.दिपक दंतुलवार यांचे नागरिकांना आवाहन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
मकरसंक्रांत सन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडविण्याचे वेध सुरु होते मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने आपल्या देशाची संपत्ती असेलल्या पक्षांची काळजी घ्यावी पतंग उडवतांना मांज्याचा नॉयलॉन दोराचा वापर करु नये असे आवाहन मानवत पोलीस स्टेशनचे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी केले आहे.

मकरसंक्रात हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्वाचा सण या सणामध्ये महिला वाण वाटत ऐकामेकांना शुभेच्छा देतात तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जातो, अनेकदा पतंग झाडांवर अडकल्या नंतर युवक पतंग तसाच झाडावर सोडून देतात त्या झाडांवर पतंगाचा मांजा अडकून राहिल्याने कित्येकदा पक्षी त्या मांजांमध्ये अडकण्याचे प्रकार घडून पक्षांना अपंगत्व सुद्धा येते तर काही पक्षांचा जीव देखील

जात असतो त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोकळ्या जागी घ्यावा तसेच झाडांवर पतंग अथवा मांजा अडकणार नाही याची काळजी घेऊन कोठे झाडांवर मांजे अडकले तर ते तातडीने काढून घ्यावे जेणे करुन आपल्या देशाची संपत्ती असलेल्या पक्षांना हानी पोहचणार नाही  आपण आपले दुकानात पतंगाचा नायलॉन मांज्या विक्री करतांना अथवा साठवणुक करतांना मिळुन आल्यास आपले विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईंल असे प्रसिद्धी पञिकेद्वारे पो.नि.दिपक दंतुलवार यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment